सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी

Siddharth Chandekar Biography Marathi

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी : Siddharth Chandekar Biography Marathi : मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय चेहरा म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर. क्लासमेट सारख्या जबरदस्त चित्रपटा मधून त्यांनी आपले कौशल्य दाखवले. या चित्रपटा मध्ये सिद्धार्थ यांनी अनी नावाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही भूमिका खूपच आवडली होती.

सिद्धार्थ चांदेकर हे एक मराठी चित्रपट सृष्टीत आणि मराठी टेलीविजन क्षेत्रात काम करणारे अभिनेते आहेत. ते अनेक मराठी टीव्ही मालिकेत झळकले आहेत. त्याच बरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटा मध्ये देखील काम केले आहे.

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी
सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी

आणखी वाचा

Ankush Choudhari Biography Marathi

Prajkta Mali Biography Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Web Serij
  • सिद्धार्थ यांचे लग्न मिटली सोबत
  • Other Things

Beginning:

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी : सिद्धार्थ चांदेकर यांना लहान पणा पासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. 2010 मध्ये अवधूत गुप्ते यांनचा झेंडा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तो एक पोलिटिकल सिनेमा होता. त्यात सिद्धार्थ यांनी पहिल्यांदा मराठी मध्ये काम केले.

त्या आधी सिद्धार्थ हे हमणे जिना सिख लिया या हिन्दी चित्रपटात दिसले होते.

या चित्रपटा द्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. हमणे जिना सिख लिया हा हिन्दी चित्रपट 2007 मध्ये प्रसारीत झाला होता.

मराठी टीव्ही क्षेत्रात त्यांनी अग्निहोत्र या मालिके पासून पदार्पण केले. ही मालिका तेव्हा ची खूपच लोकप्रिय अशी मालिका झाली होती.

त्यानंतर ते झेंडा या चित्रपटात दिसले.

क्लासमेट मधील सिद्धार्थ यांची भूमिका कोणी विसरू शकणार नाही. कारण त्यांची भूमिका तेवढी सगळ्यांनी डोक्यावर घेतली होती. अनी नावाची भूमिका होती ती.

सिद्धार्थ यांना नंतर 2014 मध्ये बावरे प्रेम या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटात उर्मिला कानिटकर या सुद्धा त्यांच्या सोबत मुख्य भूमिकेत काम करत होत्या.

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी

Personal Info And More :

नाव सिद्धार्थ चांदेकर
टोपण नाव सिद्धार्थ, सिड
जन्म दिनांक 14 जून 1991
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 33 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका अग्निहोत्र, सांग तु आहेस का , कशाला उद्याची बात, जिवलगा, मधू एथे अन चंद्र तिथे

Physical Status and More :

ऊंची 5’8″ फीट
वजन 75 केजी
मेजर मेंट्स 44-34-14
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज चित्रपट पाहणे , कादंबरी वाचने
डेबुट फिल्म हमणे जिना सिख लिया- 2007 – हिन्दी
डेबुट मालिका अग्निहोत्र – 2009 – मराठी

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी : सिद्धार्थ चांदेकर यांचा जन्म 14 जून 1991 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण ही दोन्ही पुणे येथेच झाले. त्यांचे मुळ गाव ही परभणी आहे. परभणी मधील जिणतुर ही त्यांचे गाव पण ते लाहाणाचे मोठे पुणे यरठे सदाशिव पेठ मध्ये झाले. त्यांना एक बहीण आहे, त्यांचे नाव सुमेधा चांदेकर आहे.

सिद्धार्थ यांचे शालेय शिक्षण एस डी कटारिया हाय स्कूल मधून पूर्ण झाले. यत्या नंतर कॉलेज चे शिक्षण ही सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे महाराष्ट्र येथून पूर्ण झाले.

अभिनया सोबतच त्यांना फोटो ग्राफी ची देखील आवड आहे. ते खूप मोठे डॉग लवर आहेत. त्यांच्याकडे त्यांचा एक कुत्रा आहे. ते त्यांना आपले फॅमिली मेंबर च समजतात. त्याच्या वर खूप माया लावतात.

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी
सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण एस डी कटारिया हायस्कूल, पुणे, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज, पुणे, महाराष्ट्र
शिक्षण ग्रॅजुएट (पदवीधर )
फॅमिली
आईचे नाव सीमा चांदेकर
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण सुमेधा चांदेकर
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव मिताली मयेकर
लग्न दिनांक 2021

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी : सिद्धार्थ चांदेकर यांची आई सीमा चांदेकर या देखील मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात काम केले आहे. त्यामुळेच सिद्धरठ यांना ही अभिनय ची आवड निर्माण झाली होती. कॉलेज मध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिका, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घतल होता.

काही कारनामुळे सिद्धार्थ यांचे वडील आणि आई हे ते लहान असताना च वेगळे झाले होते. सिद्धार्थ यांचा सांभाळ त्यांच्या आई ने केला.सिद्धार्थ यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम आहे. त्यामुळे सिद्धार्थ चांडेकर ही आपल्या नावापुढे अभिमानाने आपल्या आईचे नाव लावतात.

काही दिवस पूर्वी सिद्धार्थ यांनी त्यांच्या आईचे दुसरे लग्न लाऊन दिले. त्यासाठी त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे. सिद्धार्थ म्हणतात की त्यांच्या आईने त्यांच्या साठी खूप केले, आता त्यांच्या साठी काही करण्याची गरज होती. तु तुझ ही आयुष्य जग अशी त्यांची भावणा होती. या लग्नासाठी सर्वांकडून सिड यांचे कौतुक होत आहे.

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी:

Films :

वर्षे चित्रपट भूमिका
2008 हमणे जिना सिख लिया आश्विन
2010 झेंडा उमेश जगताप
2011 बालगंधर्व अभयंकर महादेव
2012 जय जय महाराष्ट्र माझा रजत
2012 सतरंगी रे yezdi (मयकेल )
2013 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतमाहीत नाही
2013 संशय कल्लोळ सिद्धार्थ
2013 लग्न पहावे करून राहुल कुलकर्णी
2014 बावरे प्रेम हे नील रजअध्यक्ष
2014 दुसरी गोष्ट माहीत नाही
2015 ऑनलाइन बिनलाइन सिड
2015 क्लासमेट अनिरुद्ध (अन्या )
2015 साता लोटा पण सगळा खोटा विरेन्द्र
2016 वजनदार आलोक दीक्षित
2016 हरवले आणि सापडले मानस
2016 पिंडदाण आशुतोष
2017 बस स्थानक विनीत
2018 रणांगण वरद कुलकर्णी
2018 गुलाबजामून आदित्य नाईक
2021 झिम्मा कबीर
2021 बेफाम सिद्धार्थ
2023 झिम्मा 2 कबीर
2024 ओले आले प्रसारित नाही
2024 अभिनंदन प्रसारित नाही

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी : सिद्धार्थ यांनी 2015 मध्ये क्लासमेट हा चित्रपट केला आणि तो त्यांच्या करियर चा मानबिंदू ठरला. त्यानंतर त्यांनी बावरे प्रेम हे, झेंडा, बालगंधर्व, सतरंगी रे, जय जय महाराष्ट्र माझा, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, गुलांजमून, ऑनलाइन बिनलाइन, या सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

पिंडदान, रणांगण, झिम्मा, झिम्मा 2, ही सिनेमे त्यांचे खूप हित झाले. झिम्मा आणि झिम्मा 2 या चित्रपट मध्ये सिद्धार्थ यांनी सर्व महिला नच्या भूमिकेतून भूमिका निभावली. झिम्मा मध्ये त्यांची कबीर नावाची भूमिका होती.

2024 मध्ये आता ते ओले आले आणि अभिनंदन या चित्रपटा मध्ये दिसणार आहेत. त्यांचे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचा कोणता ही सिनेमा असला तरी सगळे लोक त्यांना भरभरून प्रेम देतात. ते मराठी सिने सृष्टितील लोकप्रिय असे अभिनेते बनले आहेत.

Television Show: (मालिका )

  • 2010 – अग्निहोत्र ( नील अग्निहोत्री )
  • 2020 – 2021 – सांग तु आहेस का ,(स्वराज )
  • 2011 – कशाला उद्याची बात,(आदित्य महाशबडे )
  • 2019 – जिवलगा,(निखिल )
  • 2011 – मधू एथे अन चंद्र तिथे (मोहन )
  • 2017 – प्रेम तो (श्री )
  • 2021 – बिग बॉस मराठी 3 (पाहुणे )
  • 2021 – मुलगी झाली हो ( मी होणार सुपर स्टार च्या प्रमोशन साठी )

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी: सांग तु आहेस का ? या मालिकेत सिद्धार्थ यांनी स्वराज नावाची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. शिवानी रांगोळे या यात सोना नावाच्या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.

सांग तु आहेस का ? ही मालिका 2020 – 2021 मध्ये स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होत होती.

आणखी ते जीवलगा या मालिकेत 2019 मध्ये दिसले. सिद्धार्थ या मालिके मध्ये निखिल या नावाची भूमिका सकरताना दिसत होते.

2021 मध्ये ते मुलगी झाली हो या मालिकेत ते मी होणार सुपर स्टार या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी ते आले होते. त्यानंतर 2021 मध्ये बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये सिद्धार्थ ही पाहुणे म्हणून आले होते.

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी :

Web Sirij :

  • सिटी ऑफ ड्रीम्स (2019 ) Hotstar वर

सिद्धार्थ यांचे लग्न मिताली सोबत :

सिद्धार्थ चांदेकर पत्नी मिताली मयेकर सोबत
सिद्धार्थ चांदेकर पत्नी मिताली मयेकर सोबत

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी: सिद्धार्थ चांदेकर यांना मराठी सिने सृष्टितील चॉकलेट बॉय असे म्हणतात. त्यांचे व्यक्तिमत्व तसे देखणे आणि हुशार असे आहे. तसेच मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या जोडीला क्यूट कपल असे देखील म्हणले जाते.

मिताली मयेकर या अभिनेत्री आहेत. उर्फी या चित्रपटा मध्ये त्या झलकल्या होत्या. त्यांनी काही मालिके मध्ये सुद्धा काम केले आहे. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ हे दोघे रीलेशन शिप मध्ये होते. गेले दोन तीन वर्षे हे कपल खूप चर्चेत होते.

valentine डे च्या दिवशी सिद्धार्थ आणि मिताली यांनि एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली instagram वर फोटो शेअर करून दिली. आणि 21 जानेवारी 2021 मध्ये त्यांनी लग्न केले.

त्यांचे लग्न हे पुण्यातील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे पार पडले. लग्न झाले ते त्यांचे अगदी पारंपरिक पद्धतीने. कुणाची दृष्ट लागावी असे सगळे झाले होते.

भित्रा सिद्धार्थ

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी: सिद्धार्थ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते खूप भित्रे आहेत. इतके की रात्री ते अंधारात झोपत सुद्धा नाहीत.

आणखी वाचा

Sharad Kelkar Biography Marathi