शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography
शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography: या लेखामध्ये आपण ‘होणार सून मी या घरची‘ मधील श्री आणि आता चालू असलेल्या ‘मुरांबा ‘मधील ‘अक्षय‘ विषयी जाणून घेऊ. शशांक केतकर हे एक मराठी टेलिविजन अभिनेते आहेत. ते प्रामुख्याने मराठी चित्रपटात, नाटकात आणि टेलीविजन मालिका मध्ये काम करतात. होणार सून मी या घरची या मालिके पासून ते घराघरात श्री म्हणून ओळखले जाऊ लागले. होणार सून मी घराची या मालिकेला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली.

शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography
Contents:
- Beginning
- Personal Life
- Television Show
- Films
- Awards
- Plays
- About Things
Beginning :
शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography : शशांक केतकर हे मराठी थियटेर आणि मराठी टेलीविजन वर काम करणारे अभिनेते आहेत. त्यांनी 2013 मध्ये झी मराठी वाहिनी वरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत काम केले. ते या मालिके मध्ये श्रीरंग ‘श्री’ ची भूमिका साकारत होते. होणार सून मी या घरची मालिका खूप कमी कालावधीत लोकप्रिय झाली. त्यातील कलाकार खूप प्रसिद्धीस आले. श्री आणि जान्हवी ला लोक घराघरात ओळखू लागले होते.
जान्हवी ची भूमिका तेजश्री प्रधान यांनी तर श्री ची भूमिका शशांक केतकर यांनी केली होती.
सर्वप्रथम त्यांनी टेलीविजन वर ETV मराठी या वाहिनी वर मराठी मालिका रंग माझ्या वेगळा या मालिकेतून पदार्पण केले.
Personal Life/ Bio
नाव | शशांक केतकर |
टोपणनाव | शशांक, श्री |
जन्म दिनांक | 15 सप्टेंबर 1985 |
जन्म स्थळ | पुणे, महाराष्ट्र, भारत |
जन्म वार | माहीत नाही |
वय | 38 (2023) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
मुळगाव | पुणे, महाराष्ट्र , भारत |
कार्य क्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |

शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography : शशांक केतकर यांचा जन्म 15 सेप्टेंबर 1985 ला पुणे महाराष्ट्र येथे झाला. शिरीष केतकर हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. शालेय शिक्षण हे त्यांचे पुन्यातच झाले. कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे डी, वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ,आकुरडी, पुणे येथून झाले.
केतकर यांनी नंतर चे पदवउत्तर पदवी ही ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी येथून अभियांत्रिकी व्यवस्थापनात संपादन केली.
ऑस्ट्रेलिया मधील जलतरण शाळेत कर्तव्य व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले.
सिडनी मध्ये असताना ते अनेक मराठी संगीत आयोजन ,नाटक यामध्ये भाग घेत असत. भारता मध्ये परतल्यानंतर त्यांनी छंद म्हणून ही कला जोपासायची ठरवले.
त्यांनी त्यांची पहिली भूमिका ही लिखित पूर्णविराम या नाटकात केली.
आणखी वाचा
Rasika Sunil Biography In Marathi
Ankita lokhande Biography In Marathi
Education Family and More :
शालेय शिक्षण | पुणे , महाराष्ट्र , भारत |
महाविद्यालईन शिक्षण | डी, वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ,आकुरडी, पुणे, महाराष्ट्र |
पदविउत्तर शिक्षण | सिडनी , ऑस्ट्रेलिया |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | शिरीष केतकर |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी | प्रियंका ढवळे (वकील ) |
लग्न दिनांक | 2017 |
भाऊ | माहीत नाही |
बहीण | दीक्षा केतकर |

शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography : केतकर शशांक यांचे दोन विवाह झाले आहेत. पहिला वर्ष 2014 मध्ये तेजश्री प्रधान या मराठी अभिनेत्री सोबत झाला होता. पण काही कारना मुळे त्या दोघांचा 1 ते 2 वर्षात घटस्फोट झाला. त्या नंतर अभिनेते शशांक केतकर यांनी 2017 मध्ये त्यांची मैत्रीण प्रियंका ढवळे सोबत दूसरा विवाह केला. त्या व्यवसायाने वकील आहेत.
शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान
केतकर शशांक यांनी “होणार सून मी या घरची “या झी मराठीच्या मालिकेत मुख्य भूमिका केली होती. जानवी ची भूमिका ही तेजश्री प्रधान यांनी केली होती. ही मालिका 2013 ते 2016 मध्ये खूप लोकप्रिय अशी मालिका होती.
Films (चित्रपट)
वर्ष | शीर्षक | भूमिका |
2016 | वन वे तिकीट | अनिकेत |
2017 | वाडा | – |
2018 | आरोन (इंडो -फ्रेंच) | माधव |
2018 | 31 दिवस | मकरंद सावंत |
2020 | गोष्ट एक पैठणीची | सुबोध |
Television show :
वर्ष | शीर्षक | भूमिका |
2011-2012 | सुवासिनी | जयराम |
2012 | रंग माझ्या वेगळा | समीर |
2012 | कालाय तस्मै नमह | कैलास |
2013 | स्वप्नांच्या पलीकडे | अनिकेत गायधणी |
2013-2016 | होणार सून मी या घरची | श्रीरंग गोखले (श्री ) |
2016-2017 | इथेच टक तंबू | कपिल साठे |
2017 | नकटीच्या लग्नाला यायच हं | श्री. केतकर |
2018-2020 | सुखांच्या सरींनी हे मन बावरले | सिद्धार्थ तत्ववादी |
2021 | पहिले न मी तुला | समर जहांगीरदार |
2022-2023-चालू | मुरांबा | अक्षय मुकादम |

Plays (नाटक):
- पूर्णविराम
- गोष्ट तशी गंमतीची
Web series:
- 2023 – scam- जयन्त करमरकर उर्फ जेके
शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography : अभिनय कारकीर्द
शशांक केतकर शिक्षण नंतर पुण्यामध्ये आले व “सुदर्शन रंगमंच ” या नाटकाच्या ग्रुप मध्ये सामील झाले. तिथे त्यांनी सचिन कुंडाळकर आणि प्रमोद काळे यांनी दिग्दर्शन केलेले ‘पूर्णविराम’ हे नाटक त्यामध्ये त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी त्यानंतर मराठी टेलीविजन मालिका साठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कालाय तसमेह नमह या मालिकेमध्ये काम मिळाले. त्यात त्यांनी कैलास नावाची भूमिका साकारली. ETV मराठी या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत होती. या मालिके द्वारे त्यांचे टेलीविजन मालिका मध्ये पदार्पण झाले.
स्वप्नांच्या पलीकडे या स्टार प्रवाह वाहिनी च्या मालिका मध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली. त्यात अनिकेत गायधणी नावाची भूमिका शशांक यांनी साकारली.
सर्वात मोठी प्रसिद्धी त्यांना “होणार सून मी या घरची” या मालिके मुळे मिळाली. त्यातील श्री आणि जानवी ही जोडी अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मालिके ला एटकी वर्षे उलटून गेली तरीही प्रेषक या भूमिका ना अजून विसरलेले नाहीत.
शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography: मराठी अवार्ड्स मध्ये शशांक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि तेजश्री प्रधान हिच्या सोबत सर्वोत्कृष्ट जोडी हे पुरस्कार मिळाले. असे अनेक पुरस्कार या मालिके मुळे मिळाले. नेटवर्क आणि सोशल मीडिया वर या मालिकेचे डायलॉग खूप प्रसिद्ध झाले होते. त्यात जानवी cha “काहीही ह श्री !” हा डायलॉग जरा जास्तच भाव खाऊन गेला. यावर खूप असे मईम्स आणि विनोद प्रसिद्ध झाले होते.

शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography : तेजश्री यांचे सोबत घटस्फोट झाल्यानंतर शशांक यांनी दुसरे लग्न केले. दुसरे लग्न ही त्यांनी त्यांच्या मैत्रिणी सोबत केले. त्यांच्या मैत्रिणीच नाव प्रियंका ढवळे. प्रियंका आणि शशांक यांची पहिली ओळख ही फेसबूक वर झाली होती. ते दोघे फेसबूक वरच बोलत पण होते. नंतर त्यांच बोलण कमी झाल कारण शशांक त्याच्या का मामध्ये बिझी होत गेला. मुळात ते सोशल मीडिया चा वापर कमी करत असल्यामुळ त्या दोघंच बोलण ही बंद होत. जवळ जवळ दीड वर्ष त्या दोघा मध्ये कॉनटॅक्ट झाला नव्हता.
प्रियंका ढवळे या उत्तम भरनाट्यम डान्सर आणि एक वकील सुद्धा आहेत. त्यांनी अरेंग गतरम ही पूर्ण केले आहे. त्यामुळे शशांक यांच्या अभिनयात काही खचगळ असेल तर त्या उत्तम प्रकारे सांगतात. आणि संधि मिळाली तर अभिनय क्षेत्रात ही उतरूअशी अपेक्षा करतात.
एकमेकांच्या स्वभाव सारखे नसून ही ते दोघे एकमेकांना उत्तम सांभाळून घेतात.
शशांक यांना बाहेर फिरायला आवडत नाही तर घरात बसून टाइम स्पेंड करायला त्यांना आवडत याउलट प्प्रियंका ढवळे यांना बाहेर फिरायला व ते एक्सपलोर करायला फार आवडते.
शिवाय प्रियंका यांना स्वयंपाक जास्त येत नसला तरी ही त्या छोट्या छोट्या रेसिपी ट्राय करत असतात आणि या उलट शशांक ही उत्तम कूक आहेत.
आता सध्या स्टार प्रवाह या वाहिनी वर चालू असलेली “मुरांबा” ही मालिका यामध्ये ही ते स्वयंपाक उत्तम बनवताना दिसतात. या मध्ये अक्षय मुकादम ही भूमिका ते पर पाडतात.
शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography:Awards
- 2013 -झी मराठी पुरस्कार -सर्वोत्कृष्ट अभिनेता
- 2013- झी मराठी पुरस्कार-सर्वोत्कृष्ट जोडी
- 2014-झी मराठी पुरस्कार-सर्वोत्कृष्ट अभिनेता
- 2015- मिकटा -सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता
- 2015- अखिल भारतीय नाट्य परिषद – सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता
- 2019 – कलर्स मराठी पुरस्कार -बेस्ट कपल
- 2019 -कलर्स मराठी पुरस्कार -सर्वोत्कृष्ट अभिनेता
- 2021 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सबसे प्रभावशाली व्यक्तिमत्व
शशांक केतकर यांचे प्राणी प्रेम :
- शशांक केतकर यांच्यावर प्राणी ही प्रेम करतात ते जितके प्राण्यावर प्रेम करतात तेवढेच ते ही रिटर्न करतात. त्यांच्या कडे कुत्री आणि मांजरे दोन्ही आहेत. शशांक हे त्यांना प्रेमाने रोज खाऊ घालत असतात. प्रियंका या ही प्राणी प्रेमी आहेत, त्या ही प्राण्यांची तेवढीच काळजी घेतात.
- अभिनेता तर ते आहेतच , पण ते रस्त्यावर असलेल्या कुत्री आणि मांजरीच पुनर्वसनाच काम देखील करतात. त्यांच्या कडे एक मॅगी नावा च कुत्रा होता. त्याच निधन 2018 मध्ये झाल , पण ते त्याचे फोटो शेअर करत असतात. त्यावरून तो कुत्रा त्यांना फार आवडत होता ही दिसून येते.
- आता सध्या त्यांच्याकडे सिडनी नावाचा कुत्रा आहे. हा कुत्रा त्यांना सेटवर शूटिंग च्या दरम्यान सापडला होता.
हे पण वाचा